नागपूर शहर: हुडकेश्वरमध्ये भरदिवसा घरफोडी; ५ लाख ८१ हजारांचा ऐवज लंपास
सात जूनला रात्री आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयहिंद नगरात अज्ञात चोरट्याने एका बंद घराचे कुलूप तोडून ५ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी मेघराज रोडगे कामानिमित्त बाहेरगावी असताना ६ जून रोजी दुपारी १ ते २ च्या दरम्यान ही घटना घडली.चोरट्याने घरातील २ हजार रुपये रोख, सोन्याचा सिक्का आणि परिसरातील हुंडाई आय-२० कार असा एकूण ५,८१,००० रुपयांचा मुद्देमाल चोरला. फिर्यादीने मोबाईलवर सीसीटीव्हीद्वारे ही घटना पाहिली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी