लातूर: साने गुरुजी-आंबेडकरांच्या समतेच्या लढ्याला विरोध कुणी केला?विवेक जागर दिनानिमित्त काँग्रेस प्रवक्ते पवार यांचा सवाल
Latur, Latur | Nov 2, 2025 लातूर -महाराष्ट्र अंनिसतर्फे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनी आयोजित विवेक जागरदिन व्याख्यानमालेत, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंतराव पवार यांनी साने गुरुजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या सत्याग्रही लढ्यांना राज्यातील काही घटकांनी दिलेल्या विरोधावर तीव्र संताप व्यक्त केला.हॉटेल अंजनी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष माधव बावगे होते.