मिरज: गोरक्षकांना पाठिंबा, आमदार नायकवडी व आमदार खोत यांच्या विरोधात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे मारुती चौकात आंदोलन
Miraj, Sangli | Aug 29, 2025 महाराष्ट्रातील प्रामाणिक गोरक्षण करणाऱ्या गोरक्षकांना पाठिंबा देण्यासाठी तसेच गोरक्षकांना वारंवार बदनाम करणाऱ्या आमदार इद्रिस नायकवडी आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या विरोधात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता मारुती चौक येथे शिवतीर्थ समोर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले याचे नेतृत्वाखाली करण्यात आले.