कल्याण: कल्याण मध्ये पुन्हा मराठी आणि परप्रांतीय महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, महिला पोलीस देखील जखमी, व्हिडिओ व्हायरल
Kalyan, Thane | Sep 16, 2025 कल्याण मध्ये दुकान मालकीच्या वादावरून मराठी कुटुंब आणि परप्रांतीय कुटुंबामध्ये वाद सुरू होता. मनपा अधिकाऱ्यांनी हा वाद मिटवण्यासाठी मोजणी घेण्याचे ठरवले मात्र मोजणीला अधिकारी आले असताना परप्रांतीय कुटुंबांनी विरोध केला. यावेळी मराठी आणि परप्रांतीय कुटुंबातील महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. सोडवण्यासाठी गेलेली पोलीस महिला देखील जखमी झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रकरणी परप्रांतीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.