ठाण्यामध्ये मागील काही दिवसात दोन ठिकाणी बिबट्या आढळून आला होता. त्यानंतर पुन्हा मध्यरात्रीच्या सुमारास वारली पाडा परिसरातील बुद्ध विहार येथे बिबट्याचे दर्शन झाले. बुद्ध विहार परिसरामध्ये बिबट्या येताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने याची दखल घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी रहिवासी करत आहेत. रात्रीच्या वेळी रहिवासी प्रचंड घाबरत असून घराबाहेर देखील पडत नसल्याचे सांगितले जात आहे.