शालेय विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय स्तरीय शालेय क्रीडा सांस्कृतिक महोत्सव २०२५-२०२६ (केंद्र: देवसर्रा व चुल्हाड) च्या यशस्वी आयोजनासाठी दिनांक १६ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान जिल्हा परिषद हायस्कूल चुल्हाड येथे महत्त्वपूर्ण सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला माजी सभापती जिल्हा परिषद भंडारा तथा जिल्हा परिषद सदस्य रमेश पारधी आणि जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र ढबाले, उपसभापती पंचायत समिती तुमसर सुभाष बोरकर, पंचायत समित...