एरंडोल: कढोली या गावात खळ्याच्या समोर लावलेली मोटरसायकल टिटवी ता.पारोळा येथील एकाने केली चोरी,एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल
एरंडोल तालुक्यात कढोली हे गाव आहे. या गावातील रहिवासी किशोर बडगुजर यांनी आपली मोटरसायकल क्रमांक एम. एच. १९ सी. एन. १७७२ ही त्यांच्या गावातील खळ्या समोर लावली होती. तेथून त्यांची ही मोटरसायकल दिलीप शांताराम पाटील राहणार टिटवी तालुका पारोळा यांनी चोरी केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.