कोल्हापुरात ऐतिहासिक सोहळा! अंबाबाई मंदिराच्या शिखरावर बसविला तब्बल अडीज कोटींचा सोन्याचा 'सोन्याचा कळस'...
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या शिखरावर सुमारे अडीच कोटी रुपये मूल्याचा आणि दीड किलो सोन्याचा कळस गुरुवारी ११ मे रोजी रात्री विधिवत बसविण्यात आला. अधिक मासातील दानाला असलेले धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन हे काम करण्यात आले असून, शुक्रवारी १२ मे रोजी वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींमध्ये कळसाचे पूजन करण्यात येणार आहे. शिखराचे संरक्षण करण्यासाठी तांब्याचे संरक्षक आवरण बसविण्याची संकल्पना पुढे आली. त्याचवेळी गोव्यातील एका भाविकाने सोन्याचा कळस दान करण्याची इच्छा व्यक्त केल्याने या उपक्रमाला नवे स्वरूप मिळाले. सहा फूट उंचीच्या मूळ शिखराचा अभ्यास करून मंगलोर येथील कुशल कारागिरांकडून कळस तयार करण्यात आला. कळसारोहणाचे काम गुरुवारी रात्री ८ वाजता सुरू करण्यात आले. मंदिराच्या मूळ वास्तुरचनेला धक्का न लावता शिखरावर कळस बसविल्याने मंदिराच्या वैभवात आणखी भर पडली.
VC @all_about_kolhapur_
.
.
.
#Kolhapur
#AmbabaiTemple
#KolhapurAmbabai
#KarveerNivasini
#MahalakshmiKolhapur
#GoldenKalas
#HistoricMoment#AdhikMaas
#VedicRituals
#Blessings
Haveli, Pune | Jun 12, 2026