नागपूर शहर: नागपुरात अवैध शस्त्रांसह तरुण जेरबंद : दर्शन पाटील पोलीस निरीक्षक
सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांनी 6 जुलै ला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार,सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुदामपुरी भागात सामाजिक सुरक्षा विभागाने 'कॉम्बिंग ऑपरेशन' दरम्यान धाड टाकून प्रेमसिंह जितेंद्र बैस या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल, ५ जिवंत काडतुसे आणि धारदार तलवारीसह एकूण ७३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांनी दिली आहे.