नागपूर शहर: लग्न आणि पत्नीच्या मृत्यूचे खोटे नाटक रचून महिलेची लाखोची फसवणूक, आरोपी ताब्यात : संदीप बुवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक
तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी 30 मे ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरून ओळख करून एका ३१ वर्षीय घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवत १४ लाख ८० हजार रुपयांना गंडा घातल्याची आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे.