नागपूर शहर: रामबाग येथे कुलरचा करंट लागल्याने 47 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
23 एप्रिल ला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे इमामवाडा हद्दीतील रामबाग येथे नितीन मेश्राम वय 47 वर्ष हे घरात सुरू असलेला कुलर अचानक बंद पडल्याने बघण्याकरिता इलेक्ट्रिक बोर्ड मधील प्लग काढत असताना अचानक करंट लागल्याने बेशुद्ध झाले त्यांना उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राप्त सूचनेवरून इमामवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.