नागपूर शहर: न्यू कैलास नगर येथे घरफोडी करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
27 एप्रिलला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे अजनी हद्दीतील न्यू कैलास नगर येथे राहणारे योगेंद्र मानेकर हे घराला कुलूप लावून नातेवाईकाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने किंमत एक लाख 80 हजार रुपये चोरून नेले या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.