खंडाळा: लोणंदमध्ये राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या विरोधात शेतकऱ्यांचा संताप; थेट काम बंद पाडले
शिरवळ ते लोणंददरम्यान सुरू असलेले राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे चौपदरीकरणाचे काम शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बंद पाडले. जमिनीचा योग्य मोबदला आणि भूसंपादनाबाबत प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट माहिती न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद पाडत प्रशासनाचे लक्ष वेधले. लोणंद परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात जाणार आहेत. मात्र किती क्षेत्र संपादित होणार आणि त्यासाठी किती मोबदला मिळणार, याबाबत निश्चित माहिती देण्यात आली नाही.