सेलू: हिंगणी येथे क्षुल्लक कारणातून दिली मारण्याची धमकी, सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Oct 6, 2024 क्षुल्लक कारणातून झालेल्या वादात एकाने मारण्याची धमकी दिली. ही घटना ता. 5 शनिवारी रात्री 9.15 वाजताचे सुमारास घडली. याप्रकरणी अनिल किरप्पा जाधव वय 40 रा. हिंगणी यांनी शरण आप्पा मारोती जाधव रा. हिंगणी याचे विरोधात ता. 6 रविवारला सकाळी 11 वाजता तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.