सेलू: रिधोरा येथे पंचधारा जलाशयात दगडावरून घसरून तरुणाचा मृत्यू; सेलू पोलिसांत मर्ग दाखल
Seloo, Wardha | Oct 5, 2024 तालुक्याच्या पंचधारा तलावावर आलेल्या इसमाचा दगडारून घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ता. 5 शनिवारी दुपारी 1.30 ते 2 वाजताचे दरम्यान घडली. जयवंत कवडू गव्हाळे वय 45 वर्षे रा. आकोली ता. सेलू असे मृकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून मृतदेह शवविच्छेदनाकरिता सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.