नागपूर शहर: सनातन धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; नागपुरात तृतीयपंथी महिलेवर गुन्हा दाखल, मागितली सार्वजनिक माफी
नागपूरच्या जरीपटका परिसरात सनातन धर्माबद्दल कथित वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी एका तृतीयपंथी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तिने सनातन धर्माबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखावणारी विधाने केली असल्याचा आरोप करण्यात आला. हा व्हिडिओ समोर येताच हिंदू संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला