नागपूर शहर: आचारसंहितेमुळे नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प रखडला; अर्थसंकल्प सादरीकरणाला ब्रेक
नागपूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी गेल्या दोन महिन्यांपासून तयार केलेला अर्थसंकल्प आज विशेष सभेत सादर करता आला नाही.निवडणूक आयोगाने काल (सोमवारी) स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर केल्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. परिणामी, महापौर निता ठाकरे यांनी सभा सुरू होताच ती तहकूब केली.