नागपूर शहर: तांदूळ व्यवहारात २० लाखांची फसवणूक; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल: अरुण क्षीरसागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी 12 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार तांदूळ मिळवून देण्याच्या नावाखाली एका व्यावसायिकाची २० लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लकड गंज पोलिसांनी चंद्रपूर येथील पाच आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.