पनवेल: तळोजा कारागृहात माहीमच्या कैद्यावर हल्ला; कैदी गंभीर जखमी
Panvel, Raigad | Apr 18, 2026 तळोजा मध्यवर्ती कारागृहात पैशाच्या वादातून झालेल्या हल्ल्यात माहीम येथील न्यायबंदी अल्तमश युसुफ शेख (वय 38) गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारागृहाच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तळोजा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक 3 मधील बॅरेक क्रमांक 8 मध्ये बुधवारी (15 एप्रिल) सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. अल्तमश शेख याच्या बरॅकमध्ये असलेल्या मुबीन कादर शेख या कैद्याने अल्तमशवर पैशांसाठी दबाव टाकल्याचे सांगितले जात आहे.