आर्वी येथे पदवीधर उमेदवाराच्या प्रचारार्थ माजी मंत्री सुनील केदार यांची आढावा बैठक
Seloo, Wardha | Oct 15, 2026 *पदवीधर उमेदवाराच्या प्रचारार्थ श्री सुनील जी केदार यांची आढावा बैठक* आर्वी प्रतिनिधि, आर्वी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव श्री .अनंत दादा मोहोड यांच्या जनसंपर्क कार्यालय आर्वी येथे पदवीधर उमेदवार श्री .अभिजीतजी वंजारी यांच्या प्रचाराच्या संबंधाने आढावा घेण्याकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते ,माजी मंत्री. वर्धा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ,माननीय श्री सुनील जी केदार यांनी भेट दिली असता त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन आर्वी शहर अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष व आर्वी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा आर्वी शहर अनुसूचित जाती काँग्रेसचे अध्यक्ष सुधाकर जी वाघमारे ,यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी आर्वी ,आष्टी, कारंजा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व आर्वी शहरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकांमधून वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी जोरे, यांनी मतदार नोंदणी व पदवीधर मतदारांची आर्वी विधानसभेतील मतदारांची संख्या याविषयी माहिती दिली. याप्रसंगी काँग्रेसचे नेते सुनील जी केदार यांनी आपले मनोगत व्यक्त करून तिन्ही तालुक्यांमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावातील मतदारांना भेटून जिद्दीने आणि कसोशीने काम करावे, असा सल्ला दिला. कार्यक्रमाला कारंजा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष भास्करराव पांडे, आष्टी तालुका काँग्रेस सेवा दलाचे संजय इंगळे, शेखर केचे ,वर्धा जिल्हा अनुसूचित जाती काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील गाडगे, मुकुंद वाघमारे, सलीम शेख ,नरेश कुकडे, त्र्यंबकराव पांडे, महिला काँग्रेसच्या संघटिका प्रज्ञाताई मांडगावकर, आष्टी महिला काँग्रेसच्या शालिनी कोडापे, विजय श्रीराम ,गौतम पाटील, गौरी कोवे आष्टी तालुका मीडिया काँग्रेसचे अध्यक्ष