नागपूर शहर: नागपूर रेल्वे पोलिसांची धडक कारवाई: एसी कोचमधून गांजा तस्करीचा पर्दाफाश
नागपूर रेल्वेच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुरी-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये मोठी कारवाई करत १० किलो गांजासह दोन तस्करांना अटक केली आहे. शंतनु दशरथ प्रधान आणि बुल्ला रामू शेट्टी दोघेही राहणार ओडिसा अशी आरोपींची नावे आहेत.आरोपींनी पोलिसांची नजर चुकवण्यासाठी एसी कोचमध्ये 'प्रीमियम तत्काल' तिकीट काढून गांजाची तस्करी केली, मात्र गोपनीय माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यांना नागपूर रेल्वे स्थानकावर गाठले.