अमरावती महानगरपालिकेने पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) योजना २०१७ अंतर्गत लोकहिताच्या दृष्टीने शहरातील २९ फेरीवाला क्षेत्रे प्रस्तावित केली आहेत. या प्रस्तावित क्षेत्रांची सविस्तर माहिती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.amaravaticorporation.in उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, या प्रस्तावित फेरीवाला क्षेत्रांबाबत हरकती अथवा सूचना असल्यास त्या लेखी स्वरूपात सहायक आयुक्त (बाजार व परवाना विभाग), झोन-२, हॉटेल ग्रेस इन जवळ.....