औंढा नागनाथ: श्रीदत्त जयंती निमित्त औंढा नागनाथ शहरातील श्रीदत्त मंदिरात गुरुचरित्र पारायण सोहळ्यास सुरुवात
औंढा नागनाथ येथील श्री दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे श्रीदत्त भक्तांच्या वतीने आयोजन करण्यात आले तसेच गुरुचरित्र वाचन पारायण सोहळ्यास सुरुवात करण्यात आली आहे दररोज सकाळी आठ ते दहा गुरुचरित्र वाचन पारायण सोहळा, दुपारी बारा वाजता श्रीदत्त आरती व सायंकाळी सात ते नऊ दरम्यान पंचपदी घेण्यात येत आहे चार डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार असून दिनांक पाच डिसेंबर रोजी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक श्रीदत्त भक्तांकडून देण्यात आली