भडगाव: भडगाव तालुका औषध विक्रेता संघटनेच्या माध्यमातून जागतिक फार्मासिस्ट दिवस शहीद जवान निलेश सोनवणे हॉल टोणगाव येथे साजरा,
भडगाव तालुका औषध विक्रेता संघटनेच्या माध्यमातून जागतिक फार्मासिस्ट दिवस आज दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता शहीद जवान निलेश सोनवणे हॉल टोणगाव येथे साजरा करण्यात आला, या प्रसंगी अन्न व औषध प्रशासन जळगाव चे आयुक्त श्री प्रशांत अस्वार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सर्व केमिस्ट बंधूनी एकत्र येऊन फार्मसिस्ट दिनाच्या निमित्ताने साहेबांचा सत्कार करण्यात आला, याप्रसंगी साहेबांनी व्यवसाय मार्गदर्शन करून विविध विषयावर मार्गदर्शन केले.