करवीर: अंबाबाई देवीच्या गर्भगृहाची स्वच्छता; 17 सप्टेंबर रोजी अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांना बंद
शारदीय नवरात्र उत्सव 2025 करिता अंबाबाई देवीच्या गर्भगृहाची स्वच्छता उद्या बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेसहा पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्य गाभारा मूर्ती दर्शनासाठी बंद असणारा असून या काळात उत्सव मूर्तीचे दर्शन मुख्य मंदिर परिसरातील सरस्वती मंदिरा शेजारी चालू राहणार असल्याची माहिती करवीर निवासीनी अंबाबाई हक्कदार श्री पूजक मंडळाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.