लातूर महानगरपालिकेच्या आयुक्त सौ. मानसी यांच्या आदेशानुसार नवनियुक्त उपायुक्त सौ. वसुधा फड यांनी दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी स्वच्छता विभागाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. स्वच्छता विभागातील अधिकारी, मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक तसेच कंत्राटदारांसोबत घेण्यात आलेल्या बैठकीत दैनंदिन साफसफाईची कार्यपद्धती आणि प्राधान्याने करावयाच्या बाबींची चर्चा झाली.