नागपूर शहर: कपिल नगरमध्ये प्राणघातक हल्ला; पाच आरोपींना अटक: सतीश आडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कपिल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 1 जूनला रात्री 7 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसारकपिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत एका तरुणावर चाकू आणि रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या रिंकू उपाध्याय यांच्यावर गुंडांनी हा हल्ला केला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आहे