नागपूर शहर: नागपुरात विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांचा तपास सुरु
नागपूरच्या धरमपेठ परिसरातील साई अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका २० वर्षीय बी.एस.सी. विद्यार्थ्याने गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. हर्षित पेदे असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो मूळचा गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी होता. हर्षितची गुरुवारी परीक्षा होती. बुधवारी रात्री मित्रांसोबत वेळ घालवल्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला गेले होते.