नागपूर शहर: सिताबर्डी उड्डाणपुलावर वाहनांचा विचित्र अपघात; गाड्यांचे मोठे नुकसान, वाहतूक विस्कळीत
शहरातील वर्दळीच्या सिताबर्डी उड्डाणपुलावर आज एकामागोमाग एक वाहने एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही काळ पुलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.मिळालेल्या माहितीनुसार, एक पांढऱ्या रंगाची टाटा सफारी कार कवठा येथून नागपूरच्या दिशेने येत होती. या कारमधील एका तरुणाने दिलेल्या माहितीनुसार,एकाला उपचारासाठी नागपूरच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते.