घनसावंगी: जालन्यात मोसंबी बागांवर कुऱ्हाड; घनसावंगी तालुक्यातील घोन्सी बुद्रुक येथे शेतकऱ्यांचा संताप
एकेकाळी संपूर्ण मराठवाड्यात “मोसंबीचा आगार” म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यात आता मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. मोसंबीला मिळणारा कवडीमोल भाव, वाढते तापमान, उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ आणि कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता थेट मोसंबी बागांवर कुऱ्हाड फिरवण्यास सुरुवात केली आहे. घनसावंगी तालुक्यातील घोन्सी बुद्रुक परिसरात काही शेतकऱ्यांनी आपल्या मोसंबीच्या झाडांची तोड करत तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांपा