लातूर: "मोठी दुर्घटना टळली! – लातूर जिल्ह्यात ५ जण वाचले, २० कुटुंबांचे स्थलांतरण"
Latur, Latur | Sep 27, 2025 लातूर, :जिल्ह्यातील विविध तालुक्यांत पुराचा फटका बसत असताना प्रशासन, पोलीस, होमगार्ड आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे अनेक जीव वाचले. जिल्ह्यातील चार ठिकाणी बचावकार्य पार पडले असून ५ जणांची सुखरूप सुटका झाली, तर चाकूर शहरातील २० कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले आहे.