नागपूर शहर: नागपुरात 'ऑपरेशन शक्ती' अंतर्गत देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; दोन महिला अटकेत
27 जून ला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहर पोलिसांच्या 'ऑपरेशन शक्ती' अंतर्गत क्राइम ब्रांचच्या सामाजिक सुरक्षा विभागाने नंदनवन परिसरात सुरू असलेल्या देहव्यापार रॅकेटचा भंडाफोड केला आहे. २६ जून रोजी पोलिसांनी एनआयटी कॉम्प्लेक्समधील एका फ्लॅटवर छापा टाकून ही कारवाई केली.या कारवाईत पोलिसांनी दोन महिलांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शालीनी उर्फ वर्षा चंद्रशेखर वंजारी आणि अर्चना शेखर वैशंपायन अशी आहेत.