नागपूर शहर: रेल्वेच्या डब्यात महिला असुरक्षित; तक्रारीनंतरही प्रशासनाचा डोळेझाकपणा, बघा हा व्हायरल विडिओ
रेल्वे प्रवास हा सुरक्षित मानला जातो, परंतु नागपूरमधील काही महिलांना आपल्या कौटुंबिक सहलीदरम्यान अत्यंत वाईट आणि कटू अनुभवाला सामोरे जावे लागले.नागपूरमधील काही महिला आपल्या कुटुंबीयांसोबत दानापूर-सिकंदराबाद एक्सप्रेसने प्रवास करत होत्या. त्यांच्या आरक्षित डब्यात क्षमतेपेक्षा अधिक म्हणजेच सुमारे ४०० पेक्षा जास्त अनधिकृत प्रवासी घुसल्याने महिलांना डब्यात प्रवेश करणेही कठीण झाले. प्रवास सुरू असताना महिलांना अश्लील शेरेबाजी आणि छेडछाडीचा सामना करावा लागला.