अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत महात्मा फुले पोलीस आणि कल्याण वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आठ आरोपीना बेड्या ठोकल्या असून फरार असलेल्या सहा तस्करांचा शोध सुरू आहे. आठ आरोपींना ताब्यात घेऊन 35 किलो गांजा जप्त केला आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे