सातारा: सैन्य दलात भरती करतो असे सांगून युवकांची फसवणूक करणाऱ्या सैन्य दलातील जवानाच्या विरोधात गुन्हा दाखल, केली अटक
Satara, Satara | Sep 21, 2025 भारतीय सैन्य दलामध्ये एएमसी क्लार्क भरती सुरू असून तुम्हाला मी भरती करतो, असे सांगून तीन लाख ७० हजार रुपये घेऊन भरती न करता दोघांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात प्रदीप विठ्ठल काळे, वय २८, राहणार कोळे, तालुका कराड याला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार सातारा तालुक्यातील नेले किडगाव येथील रहिवासी रितेश नितीन जाधव यांना प्रदीप विठ्ठल काळे याने रक्कम घेऊन फसवणूक केली आहे.