लातूर: केंद्रेवाडी शिवारात तब्बल 8.30 फूट लांब मगर सापडली!सर्पमित्र सिद्धार्थ काळे व ग्रामस्थांनी रात्रभर चालवला थरारक रेस्क्यू
Latur, Latur | Nov 1, 2025 लातूर -लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी शिवारात शुक्रवारी रात्री एक थरारक प्रसंग घडला. शेतकऱ्यांच्या नजरेस तब्बल 8.30 फूट लांबीची आणि सुमारे 100 किलो वजनाची प्रचंड मगर दिसल्याने गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तातडीने सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांना माहिती दिली, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रभर सुरू असलेले रेस्क्यू ऑपरेशन अखेर यशस्वी ठरले.ही मगर जवळच्या नाल्यात अडकलेली आढळली होती. पाण्याच्या प्रवाहात वाहत येऊन ती केंद्रेवाडी शिवारात आली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.