नागपूर शहर: मध्यरात्री गोळीबार; वर्चस्व आणि मुलीच्या वादातून टोळीयुद्ध भडकले,: पोलीस उपायुक्त राहुल मदने
पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी 18 मे ला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील महाल भागात मध्यरात्री ११:३० ते १२:०० च्या सुमारास गोळीबाराची थरारक घटना घडली. जुन्या वादातून दोन गटात झालेल्या या राड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणातील आरोपी हे कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आरोपींचा शोध पोलीस घेत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.