महागाव: तालुक्यातील मोरवाडीजवळ शेती साहित्य चोरणारे दोन चोरट्यांना शेतकऱ्यांनी रंगेहाथ पकडले, पुसद ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात
पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील काळी दौलत ते कासोळा मार्गावर मोरवाडी जवळ शेती साहित्य चोरताना दोन चोरट्यांना शेतकऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही घटना आज मंगळवारी ४ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास घडली. अयान खान शफीक खान रा. गवळीपुरा, दिग्रस आणि सलमान रेहान खान रा. देवनगर, दिग्रस अशी आरोपींची नावे आहेत. शेतकऱ्यांनी रस्त्यालगत उभी केलेल्या बैलगाडीच्या लोखंडी चाक चोरुन आपल्या सोबत आणलेल्या ऑटो क्रमांक एम एच १२ जी टी ३२०२ मध्ये टाकत असताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.