नागपूर शहर: व्यंकटेशनगर आणि एन.आय.टी. घरकुलमध्ये महावितरणच्या कार्यालयाला नागरिकांचा घेराव
व्यंकटेशनगर आणि एन.आय.टी. घरकुल परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अघोषित वीज कपातीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. १७ एप्रिलच्या रात्री ७ ते १२ वाजेपर्यंत वीज गुल राहिल्याने संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक देत घेराव घातला आणि तीव्र घोषणाबाजी केली. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे मोठे हाल झाले. जनआक्रोशानंतर महावितरणने 18 एप्रिल ला मध्यरात्री २ वाजता वीज पुरवठा सुरळीत केला.