नागपूर शहर: छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानाचे पडसाद; नागपुरात धीरेंद्र शास्त्रींना काळे झेंडे दाखवणार सकल मराठा समाज
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितली असली तरी, त्यांच्या विरोधातील रोष अजूनही कायम असून, नागपुरात त्यांच्या कथेच्या मार्गावर सकल मराठा समाजाकडून निषेध नोंदवण्यात येणार आहे.नागपुरातील रेशीमबाग मैदानावर धीरेंद्र शास्त्री यांची 'रामकथा' सुरू आहे.