धुळे: केलेनगर परिसरात पावसाचे पाणी घरांमध्ये घुसल्याने नागरिकांची उडाली तारांबळ, मनपा आयुक्तांनी गुडघाभर पाण्यात केली पाहणी
Dhule, Dhule | Aug 23, 2024 धुळे शहरातील केले नगर नकाने रोड परिसरात गुडघाभर पावसाचे पाणी रस्त्यांवर साचल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे, विद्युत डीपीच्या जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वीजपुरवठा देखील खंडित करण्यात आला होता, या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी रात्री उशिरा या परिसराच्या परिस्थितीची पाहणी केली आहे, यादरम्यान परिसरातील नागरिकांनी व महिलांनी आयुक्तांना प्रत्येक वेळी पावसाळ्यात ही तकलीफ त्यांना सहन करावी लागत असल्याची तक्रार केली.