धर्माबाद: शहरातील शंकर गंज येथे अज्ञात चोराने केली दिवसा घरफोडी, पोलिसांत गुन्हा नोंद
दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:45 ते दुपारी 12:45 च्या दरम्यान धर्माबाद शहरातील शंकर गंज भागातील रहिवासी असणारे अभय कुमार राघवेंद्र मनुरकर हे घरास कुलूप लावून लग्न कार्यासाठी बाहेर गेले असता कुणीतरी अज्ञात चोराने याचा फायदा घेत घराचे कडी कोंडा तडून आतमध्ये प्रवेश करून कपाटातील 40 हजार किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व 10 हजार नगदी चोरून नेले होते, ह्या प्रकरणी धर्माबाद पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ पठाण हे करत आहेत.