नागपूर शहर: हुडकेश्वर पोलिसांची कारवाई: ८६ हजारांचा प्रतिबंधित तंबाकू जप्त, दोन अटकेत : अनामिका मिर्झापुरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी 23 जूनला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार हुडकेश्वर पोलिसांनी हनुमान नगर आणि शिवांगी नगर परिसरात धाड टाकून ८५,९६० रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाकू जप्त केला आहे. याप्रकरणी राजेंद्र प्रसाद साहू आणि स्वप्निल भोंड या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. एपीआय रामटेके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.