शीव-पनवेल मार्गावरून उरणच्या दिशेने जाणारा द्रवरूप डांबर घेऊन जाणारा एक टँकर शुक्रवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास पलटी झाला. बेलापूर खिंडीपासून उरणच्या दिशेने जाताना एकता सोसायटीसमोरील मार्गावर ही घटना घडली आहे. हा अपघात विचित्र गतिरोधकामुळे झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.