नागपूर शहर: जामिनावर असताना साक्षीदाराला धमकावणाऱ्या आरोपीला पुन्हा अटक : रमेश खुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
सक्करदरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी 19 जून ला रात्री 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार, साक्षीदाराला धमकावण्याच्या आरोपाखाली जामीनावर असणाऱ्या आरोपीला पुन्हा एकदा सक्करदरा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी दिली आहे.