महागाव: पंचायत समिती जवळील कन्हैया प्रिंटर्स दुकानामध्ये नाग साप आढळून आल्याने एकच खळबळ, सर्पमित्रांनी नागाला दिले जीवदान
महागाव पंचायत समिती जवळील कन्हैया प्रिंटर्स या दुकानात आज दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान अनोखी घटना घडली. दुकान उघडल्यानंतर दुकान मालकाला फनी काढून नाग साप असल्याचे दिसून आले. अचानक साप दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दुकानमालकाने तत्काळ सवना येथील सर्पमित्र गजानन येरवाळ यांना घटनेची माहिती दिली. सर्पमित्र येरवाळ यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत नागाला सुरक्षितरित्या पकडले. दरम्यान, घटनेची बातमी पसरताच परिसरातील व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने जमले