औंढा नागनाथ: जागतिक एड्स दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय येथून एड्स जनजागृती रॅली;नगराध्यक्ष खंदारे यांनी दाखविली हिरवी झेंडी
औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने दिनांक एक डिसेंबर सोमवार रोजी दुपारी साडेबारा वाजता जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती करत शहराच्या प्रमुख मार्गाने एडस जनजागृती रॅली काढण्यात आली होती. तत्पूर्वी नगराध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष मनोज देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ तृप्ती पाटील वाशीमकर,यांच्या हस्ते रॅलीस हिरवी झेंडे दाखवण्यात आली याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गजानन चव्हाण,रहिमदिन खातीब,सनी खंदारे, डॉ सतीश वाकळे,पवन इंगोले गंगाराम कुरूडे उपस्थित होते