नागपूर शहर: नागपुरात जल्लोष!भाजपचा दणदणीत विजय, डॉ. राजीव पोतदार विजयी; महाविकास आघाडीत मोठी फूट
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने आपला दबदबा कायम राखत दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळला. या निकालाने नागपूरच्या राजकारणात भाजपची संघटनशक्ती पुन्हा एकदा सिद्ध केली आहे