अलिबाग: जिल्हा परिषदेच्या सदस्यपदाची आरक्षण सोडत जाहीर
Alibag, Raigad | Oct 13, 2025 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेच्या एकू ण 59 गटांच्या सदस्यपदाचे आरक्षण सोमवारी ता.13 जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात आले. यावेळी लहान मुलीने चिट्ठी काढल्यानंतर ज्यांच्या मनाप्रमाणे आरक्षण जाहीर झाले त्यांच्या चेह-यावर आनंद तर त्यांच्या मनाविरुद्ध चिट्ठी काढल्यानंतर त्यांचा चेहरा पडलेला दिसत होता.