बोदवड: बोरगाव येथे शिवीगाळ का करत आहे अशा बोलण्यावरून तिघांना चौघांची मारहाण, बोदवड पोलिसात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Sep 20, 2025 बोदवड तालुक्यात बोरगाव हे गाव आहे. या गावात शिवीगाळ का करत आहे अशा बोलण्याच्या कारणावरून आदिनाथ गोसावी, भरत गोसावी व त्यांची वहिनी अशा तिघांना नवनाथ गोसावी, शिवाजी गोसावी, दीपक गोसावी व सत्यभामा गोसावी यांनी मारहाण केली. तेव्हा बोदवड पोलीस ठाण्यात याप्रकरणी चार जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.